Ad will apear here
Next
नगर वाचनालयातर्फे कथाकथन व निबंधलेखन स्पर्धा
‘पुलं’, ‘गदिमा’ आणि ‘बाबूजी’ यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित आयोजन
पु. ल. देशपांडेग. दि. माडगुळकरसुधीर फडकेरत्नागिरी : सध्याचे वर्ष हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे (पुलं), आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे ग. दि. माडगूळकर (गदिमा) व संगीतातील अध्वर्यू व्यक्तिमत्त्व सुधीर फडके (बाबूजी) या त्रयीच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयातर्फे निबंध व कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा जानेवारी २०१९ मध्ये होतील.

या दोन्ही स्पर्धांसाठी आठवी ते दहावी, अकरावी ते पदवी आणि खुला अशा तीन गटांत होणार आहेत. निबंध स्पर्धेच्या पहिल्या गटासाठी ‘व्यक्तिचित्रण’ (उदा. रिक्षावाले काका, फेरीवाला आदी.), ‘पराधीन आहे जगती.. पुत्र मानवाचा..’ आणि ‘आपल्या आयुष्यातील विनोदाचे स्थान’ हे विषय देण्यात आले असून, त्यासाठी ५०० शब्दांची मर्यादा आहे. अकरावी ते पदवी गटासाठी ‘अजरामर काव्यकृती- गीतरामायण’, ‘सबकुछ.. पुलं’ (‘पुलं’चे बहुआयामी व्यक्तिमत्त्व) आणि ‘मराठीचे मानबिंदू- पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगुळकर’ दे विषय असून, त्यासाठी एक हजार ते दीड हजार शब्दांची मर्यादा आहे. खुल्या गटासाठी ‘वाचकांचे हृदयस्थ पुलं’, ‘अष्टपैलू संगीतकार- सुधीर फडके आणि ‘प्रतिभावंत गदिमा’ हे विषय असून, त्यासाठी दीड ते दोन हजार शब्दांची मर्यादा आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांचे नाव पाच जानेवारीपर्यंत वाचनालयात पोहोचणे आवश्यक आहे.

कथाकथन स्पर्धेच्या आठवी ते दहावी या गटासाठी पाच ते १० मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. दुसऱ्या गटासाठी १० ते १५ मिनिटे, तर खुल्या गटासाठी १२ ते २० मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी कोणत्याही लेखकाची कथा चालणार आहे; मात्र ‘पुलं’ आणि ‘गदिमा’ यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ही स्पर्धा असल्याने विषयाची निवड उचित राहील याची दक्षता स्पर्धकांनी घेणे आवश्यक आहे. ही स्पर्धा २० जानेवारीला सकाळी आठ वाजता नगर वाचनालायत सुरू होईल; मात्र त्यात सहभागी होण्यासाठी १० जानेवारीपर्यंत वाचनालयाकडे नाव नोंदविणे आवश्यक आहे.

‘या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन ‘पुलं’, ‘गदिमा’ आणि ‘बाबूजीं’ना मानवंदना द्यावी,’ असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

निबंध स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पत्ता : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालाय, खारेघाट रस्ता, जयस्तंभ जवळ, ता. जि. रत्नागिरी.
अधिक माहितीसाठी संपर्क : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय- (०२३५२) २२२५७०.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZSLBV
Similar Posts
रत्नागिरी नगर वाचनालयाच्या स्पर्धांचा निकाल जाहीर रत्नागिरी : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयातर्फे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेले पु. ल. देशपांडे (पुलं), आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे ग. दि. माडगुळकर (गदिमा) आणि संगीतातील अध्वर्यू व्यक्तिमत्व सुधीर फडके (बाबूजी) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय निबंधलेखन व कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले होते
‘त्रिवेणी’ संगमात रसिकांना शब्द-सुरांचे स्नान रत्नागिरी : सप्तसूर म्युझिकल्स आणि अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाने आयोजित केलेल्या संगीतमय ‘त्रिवेणी’ संगमात रत्नागिरीकर रसिक अक्षरशः न्हाऊन निघाले. गीतकार ग. दि. माडगूळकर, गायक, संगीतकार सुधीर फडके व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य
गदिमा, बाबूजी, ‘पुलं’ना त्रिवेणी कार्यक्रमातून मानवंदना रत्नागिरी : गीतकार ग. दि. माडगूळकर, गायक, संगीतकार सुधीर फडके म्हणजेच बाबूजी आणि अष्टपैलू कलाकार पु. ल. देशपांडे ही महाराष्ट्राची दैवतं. अशा या त्रयीचा जन्मशताब्दी महोत्सव यंदा साजरा होत आहे. या त्रिमूर्तीमधील समान धागा म्हणजे यांचे संगीतातील अमूल्य योगदान. हाच धागा पकडून अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी
अशोक समेळ करणार ‘मी अश्वत्थामा’चे अभिवाचन रत्नागिरी : महाभारतकालीन व्यक्तिरेखेवर सुमारे २०-२१ वर्षे सखोल चिंतन व अभ्यास करून लिहिलेल्या ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या गाजलेल्या कादंबरीचे अभिवाचन आणि ती लिहिताना आलेले अनुभव अशोक समेळ यांच्या स्वतःच्या शब्दांत आणि त्यांच्या पत्नी संजीवनी समेळ यांच्या समवेत रत्नागिरीकरांना ऐकण्याची संधी मिळणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language